II श्रीराम समर्थ II
मना वासना चुकवी येरझारा |
मना कामना सांडी रे द्रव्यदारा ||
मना यातना थोर हे गर्भवासी |
मना सज्जना भेटवी राघवासी ||२१||
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !
जय जय रघुवीर समर्थ !
Friday, May 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
जेव्हा आपल्याला एखादी कल्पना प्रथम सुचते तिला स्फुरण म्हणतात .ती कल्पना मनात तीव्र झाली की तिला वासना म्हणतात .वासना आणखीन तीव्र झाली की तिला कामना म्हणतात .मानवी मनाची गती तर खूपच आहे .ते मन कोठून कोठे पोचेल सांगता येत नाही .त्यात कोणती वासना तीव्र होईल सांगता येत नाही .आणि मग माणसाचा आचार ,विचार ,उच्चार तसेच होतात .माणसाच्या आचारावरून माणसाचे विचार कळतात .माणसाच्या विचारातूनच माणूस पुन्हा जन्म घेण्याची तयारी करत असतो .
म्हणून समर्थ मनाला समजावतात :हे मना ,तू वासनेचे मूळ छेदून टाक .तरच तुझा पुन्हा गर्भवास सुटेल .जन्म मृत्युच्या येरझारा
चुकतील .तुझ्या मनात द्रव्य आणि दारा यांच्या विषयी कामना असते .तू एकवेळ ब्रह्मचर्य पाळू शकशील ,कामिनीचा मोह तू टाळू शकशील पण जगण्यासाठी तुला द्रव्य लागेलच .पण त्या द्रव्याची सुध्दा तू आसक्ती धरू नकोस .कारण तुला ते द्रव्य ,ती संपत्ती ,तुझी मुले ,तुझी बायको सर्व इथेच सोडून जायचे आहे .तुला माहिती आहे गर्भावस्थेत असताना तुला किती दु :ख भोगावे लागते .म्हणून जन्म मृत्युच्या येरझारा तुला नको असतील तर हे मना ,वासना कामनांचा छेद घे ,आणि हे करण्यासाठी तुला एक करावे लागेल, की हे सज्जन मना तुला राघवाचे नाम घ्यावे लागेल .त्यातच तुझे हित आहे .
श्लोक २१
वासना म्हणजे विविध प्रकारच्या इच्छा - आकांक्षा, ज्याचे कल्पना हे मूळ आहे !
कल्पेनेच्या राज्यातून अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण होतात, वासना निर्माण होतात. तीव्र वासानांनाच पुढे कामना हा शब्द योजिला आहे .
तेव्हा हे मना, जन्म- मृत्युच्या फेर्या चुकवायच्या असतील तर. वासानाची ओढ थांबवावी लागेल.. मन जर वास ने मध्ये गुंतून पडले तर या येरझार्या थांबणार तर कश्या ?
मागच्या श्लोकात समर्थांनी गर्भवासाचे दु:ख सांगितले आहे .. पण इकडं का प्रपंचात शिरले की हेच दु:ख विसरायला होते आणि वासनेच्या वेढ्यात मनुष्य अडकतो! आईच्या पोटात असेपर्यंत सो ह आणि बाहेर आल्यावर को ह! आणि जन्म - मृत्युच्या येर - झार्या चालूच राहतो !
वास्तविक मानवी जीवनाचे ध्येय काय आहे ? what is purpose of the life ? आपल्या संत- महन्तानी आणि तत्त्ववेत्त्यानी याचे निसंदिग्ध शब्दात उत्तर दिले आहे- मानवी जीवनाचे ध्येय - परमात्म्याशी तद्रूप होणे -- व्यक्तामधून अव्यक्तात विलीन होणे ! आपला जो आत्मा आहे तो परमात्म्याशी विलीन करणे ! हीच परमार्थाची परमावधी आहे -- याच साठी केला पाहिजे अट्टाहास ! हेच "शेवटचा दिस गोड होणे !" जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचे हेच ध्येय असले पाहिजे .. कारण अक्षय, अविनाशी,चिरंतन सुख फक्त तेव्हाच मिळू शकते .. बाकी सारे सुख हे पुन:पुन्हा वासना निर्माण करणारे- अतृप्ती वाढवणारे आणि हीन दर्जाचे सुख होय .. only cotton candy feeling!
वासना - कामना पूर्तीचे जे सौख्य आहे ते क्षणिक, नाशवंत असते , matra मनुष्य त्याच त्याच वासनेच्या वेतोल्यात अडकून चिरंतन -शाश्वत अश्या परम्सुखाला मुकतो आणि कायिक कर्म करण्याच्या ऐवजी वासनेने लडबडतो व आपले प्रारब्द्ध वाढवितो . त्याचे फळ भोगण्यासाठी " पुनरपि जनानां पुनरपि मारणं " अश्या येरझार्या चालू राहतात .या येरझार्या थांबवायच्या असतील तर वासना आवर आणि द्रव्य - दारेची कामना सोडून दे असा उपदेश समर्थांनी केला आहे !
धन्यवाद!
श्लोक २१
" मना ! वासना बाळगल्याने जन्म मरणी जीव अडकतो.त्याला व्यर्थ ये- जा करावी लागते.वासना , पैसा ,स्त्रीसुख यांच्या बद्दल इच्छा हे सोडून दे म्हणजे हे कंटाळवाणे हेलपाटे चुकतील.गर्भावसाच्या यातना भयंकर आहेत म्हणून आधी वासना मग यातना या चक्रातून सुटण्यासाठी, बा मना! भगवन्ताची त्या राघवाची भेट करून दे ."
" जन्म घेणे लागे वासनेच्या संगे " समर्थ मनाला वारंवार हेच बजावत आहेत.कोणत्या ना कोणत्या तरी वासनांच्या मुळे माणूस कर्मे करतो व त्यांचे परिणाम म्हणून भोगावे लागणारे संचित व प्रारब्ध निर्माण होते म्हणून वासना सोडणे हेच जन्म टाळण्याचे मूळ साधन ठरते.
वासना ही मूलभूत आणि कार्याची प्रेरणा म्हणून थोडी आवश्यक ही असते.याच वासनेला जेव्हा आसक्तीचे रूप प्राप्त होते, मर्यादेचे भान राहत नाही तेंव्हा ती वासना कामना बनते आणि ही वासना सोडण्याचे सामर्थ्य येण्यासाठी तीचे दृष्य-रूप म्हणजे धनसंम्पत्ती , त्या योगे येणारे मान,अपमान, कीर्ती,प्रसिद्धी, विषयीचे आकर्षण आणि काम , विरह , कलह यांचा त्याग करा.
" स्वजन सकल ही त्यागावे दु:खमुळ जे ! "
दु:खाला कारण होणारी आपलीच मंडळी स्वजन यांचा त्याग नाही करायचा, त्यांच्याशी प्रेमाचे वर्तन असावे पण त्यांच्या ममत्वात न गुंतता अलिप्तपणे राहावे.संस्काराने , अभ्यासाने , प्रयत्नाने यातून सुटणे शक्य आहे. हे सर्व का करायचे तर ते पुन्हा पुन्हा भोगाव्या लागणार्या जन्म मृत्यूचे संकट टाळण्यासाठी !.त्यासाठी गर्भवसाच्या यातानांचे समर्थ पुनरपी स्मरण करून देत आहेत.
" दृष्यांमध्ये सुखाचा शोध घेतला तर अधोगाती आहे तर अदृश्यमधील भगवांतामध्ये रमलस तर जीवनाची उन्नती होते" सुबात्ता ,उच्चशिक्षण,भरभराट,भौतिक समृद्धी मिळै तरी सुद्धा आता पुढे काय हा प्रश्ना राहतोच म्हणून आत्मॅसंमान राखून योग्य ते जीवनमान राखता येईल इतपत धनाची व्यवस्था केल्यानंतर कुठेतरी निश्चित थांबायला हवे.आधी पासूनच जीवनशैली बदलायला हवी तरच आयुष्यात भौतिक समृद्धी बरोबरच आध्यात्मिक समृद्धी ही प्राप्त करून घेतल्याचे आंतरिक समाधान मिळेल.जीवाचा पुढील प्रवास सुकर होईल.म्हणूनच हे मना सज्जना मला माझा घात करणार्या विषयांकडे ओढीत नेऊ नकोस . मला ईश्वराची, त्या राघवाची भेट घालून दे ...
mp3 link does not work. Only 23 seconds recording.
As stated Lochan Kate ( Gwaliar ) ..
श्लोक २१............
श्रीरामदासजी कहते है कि हे मनुष्य ! अपनी इच्छाओ ,आकांक्षाओ को दूर करने का प्रयत्न करते रहना चाहिये | धन,द्रव्य की इच्छाओ से दूर रहना चाहिये ,क्योकि धन-द्रव्य की वासनाये नाश का पथ है| मॉ के गर्भवास में बालक को जब अत्यंत यातनाये सहनी होती है| उस समय बालक को लगता है कि उसे श्रीराम से मिला दो |उस बंदीवास से मुक्ति मिल जाये|
[हिन्दी मे]
आन्र जाने की वासना चूकजाये|
मन कामना छोड तु द्रव्य साये|
यातना गर्भवास की भयंकर है रे|
इसलिये मिला दे मन राघव को रे||श्रीराम||२१||
Post a Comment