Friday, May 14, 2010

श्लोक २०

II श्रीराम समर्थ II

 बहु हिम्पुटी  होईजे मायेपोटी|
नको रे मना यातना तेचि मोठी ||
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी|
अधोमुख रे दु:ख त्या बालकासी || २० ||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

suvarna lele said...

समर्थ या श्लोकात सांगतात ,अरे मना ,आईच्या पोटात असताना जीवाला किती यातना सोसाव्या लागतात याची तुला कल्पना आहे का ?
गर्भाशयात वायू नसतो त्यामुळे दोन डोळे ,दोन कान ,नाकाची दोन भोके ,तोंड ,गुद,उपस्थ ही नऊ दारे बंद असतात .आईच्या पोटातील जठराग्नीच्या उष्णतेने गर्भाची हाडे व मांस उकडून निघतात .गर्भाला कातडी नसते .तो पातळ वेष्ठनात असतो .गर्भ म्हणजे चामड्यात गुंढाळलेले गाठोडे
आहे .त्याच्या आत विष्ठेचे पोतडे असते .गर्भाच्या नाळातून त्याला जगणारे रस मिळतात ..मळ,मूत्र ओंक ,पित्त यामुळे गर्भाचा जीव घाबरा होतो .गर्भावस्था म्हणजे एक प्रकाराची कैदच असते .जीव देवाला विनवतो की देवा ,माझी येथून सुटका कर .आईच्या उदरी नऊ महिने अत्यंत कष्टदायक असतात .नऊ ही दारे बंद असल्यामुळे जीव कोंडला जातो .[येथे निरोधे असा शब्द आला आहे ].तो उकडला जातो .[येथे पावे असा शब्द आला आहे .]अधोमुख म्हणजे जीव बाहेर येताना डोके खाली जाते तेव्हा तर त्या बालकाला खूप दु :ख होते .गर्भावस्थेत जरी जीव देवाला सोडव म्हणत असला तरी जन्माला आल्यावर देवाचे त्याला विस्मरण होते .म्हणून समर्थ म्हणतात :जन्म हेचि विस्मरण |ईश्वराचे ||

Gandhali said...

" जन्म झाला की पुढे व्याधी, दोष, म्रुत्यु यांचे दु:ख जे मानवाला होते त्याचे मूळ कारण जन्म . जन्माची दु:खे व जन्माचे दोष, पुढील सर्व दु:खदायक यातनां यांचे ज्ञान झाले तर पुन्हा जन्मच येणार नाही अशी माणसाने वागणूक ठेवावी यासाठी समर्थ जन्म - दोषाचे स्वरूप या श्लोकात सांगत आहेत.
संसार ताप मनुष्य वारंवार अनुभवतो, पहातो. पण ठेच लागून ही शहाणा होत नाही पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो कर्मभोगात अडकून जन्ममृत्यु भोगतो हे पाहून जनकल्याणाची तळमळ असणार्या संतानी जन्म दोषाचे अनेकवेळा वर्णन केले आहे.
गर्भावासात जीवाला फार यातना असतात.तिथे तो कोंडलेला असतो , शिजत असतो.त्याचे पोषण व आरोग्य पूर्णपणे आईच्या आहार विहारावर अवलंबून असते. तिच्या अज्ञानाने , मोहाने केलेल्या वर्तनाचे परिणाम तिच्या पेक्षा गर्भाला भोगावे लागतात. हे परस्वाधीन जीणे फार केविलवाणे असते.त्यामुळे तो जीव हिंपुटी म्हणजे खिन्न, कष्टी असतो . अधोमुख होऊनच जन्मास यावे लागते. संकुचित मार्गाने बाहेर पडण्याचे दडपण डोक्यावर ,शरीरावर येते त्यामुळे ही असह्य वेदना होतात.जाणीव नसल्यामुळे स्मरण नसते.जन्म आणि जन्मापासूनचे सर्व जीवन हे खर्या अर्थाने कमी अधिक प्रमाणात पारतंत्र्यच असते, एक बंधन असते.आणि मोक्ष म्हणजे या सर्वापासून सुटका हे ज्ञानी माणूस जाणतो अन तसे वर्तन ठेवतो.
संकटाची सुचना देण्यासाठी जेंव्हा भोंगा वाजतो तेंव्हा हातातले सर्व टाकून आपण पळापळ करतो तसेच जन्ममरणाच्या संकटापासून सावध करण्यासाठी समर्थांचा हा श्लोक म्हणजे एक धोक्याची घंटा आहे . अन यातून बाहेर कसे पडावे हे समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत.

Kalyan Swami said...

AsAs stated by Lochan Kate ( Gwaliar) ... श्रीरामदासजी कहते है कि हे मानव ! जब तक बच्चा मॉ के पेट में होता है उसे अत्यंत कष्ट होता है | उसकी यातनाये बहुत कष्टदायी होती है| गर्भवास में बालक को घुटन भरा बंदीवास होता है| जो बालक को मूकता पूर्ण सहन करना होता है जो बालक को अत्यंत कष्टदायी होता है और वो बालक को सहना ही पडता है|.

lochan kate said...

[हिन्दी मे]
गर्भ वास है रे अति यातना का|
नही रे नही वो कभी भी कभी ना||
भयावह ये यातना है प्राणि को रे|
अधोमुख हो जीव घबरा रहा रे||२०||श्रीराम||