Friday, October 28, 2011

श्लोक ९६

II श्रीराम समर्थ II 

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।
जपे रामनामावळी नित्यकाळीं॥
पिता पापरुपी तया देखवेना।
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥
 




जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

lochan kate said...

श्लोक ९६...
महा भक्त प्रह्लाद हा दैत्य कूळी |
जपे राम नामावळी नित्य काळी ||
पिता पापरुपी तया देखवेना |
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना ||९६||
हिन्दी में....
महा भक्त प्रह्लाद है दैत्य वंशी |
जपता राम नाम नित्य नियम राशी ||
पिता पाप करते उसे देखा न जाता |
राम नाम लेना उस दैत्य को ना होता ||९६||
अर्थ.... श्रीराम दासजी कहते है कि हे मानव मन ! महान भक्त प्रह्लाद दैत्य कुल का था फ़िर भी राम नाम नित्य जपता था | उसके पिता राक्षसी प्रव्रुत्ति के [पापी ] थे और उनसे यह देखा नही गया | अत: वह जन्मदाता होकर भी राक्षसी प्रव्रुत्ति का होने के कारण दैत्य मुख से रामनाम नही लेता था |

Dr.Madhavi Mahajan said...

हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद दैत्य कुळात जन्माला येऊन देखील भगवंताचे वेड त्याला जन्मजात होते . आईच्या गर्भात असताना महर्षी नारदांनी त्याच्या मातेला ’नारायण’ मंत्राचा उपदेश करुन ज्ञान दिले होते. या गर्भसंस्काराचा परिणाम असा की बाल प्रल्हाद नारायणाचा जप प्रेमाने करित असे. त्याचे सततचे भगवंताचे नामस्मरण हिरण्यकश्यपूला सहन झाले नाही. नारायणाच्या व्देषाने तो पुत्रप्रेम विसरला. आपल्याच पोटच्या मुलावर त्याने अनेक त-हेचे आघात केले. पण यासर्व प्रसंगामध्ये भक्त प्रल्हाद नारायणाचे स्मरण करत राहीला अन या नामाचा महिमा असा की भगवंताने आपल्या बालभक्ताचे या सर्व प्रसंगामध्ये रक्षण केले. एवढेच नव्हे तर नरसिंहाचा अवतार घेऊन त्याच्या पित्याला मुक्ती दिली.

मनुष्य म्हणतो मला हे चांगले करायचे आहे पण दैव साथ देत नाही प्रल्हादाच्या उदाहरणामधून त्यांनी दाखवून दिले की दैत्यकुळात जन्माला येऊन सुध्दा प्रतिकूल परिस्थितीत देखील नाम घेत राहिला. समर्थांना याठिकाणी हे दर्शवून द्यायचे आहे की मनुष्य कोठेही जन्माला आला तरी नामस्मरणाने तो ईश्वराला देखील अवतार घेण्य़ास भाग पाडतो. अशा या भगवंताचे स्मरण करुन जीवाने आपला उद्धार करुन घ्यावा हे त्यांचे सांगणे आहे.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

suvarna lele said...

महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्माला आला होता पण गर्भावस्थेत असताना त्याच्यावर भगवद भक्तीचे संस्कार झाले होते .त्यामुळे तो सतत भगवंताचे नामच घेत होता .हिरण्यकश्यपू ,भक्त प्रल्हादाचे वडील त्याला नामापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होते पण प्रल्हाद बदलला नाही .त्याने नाम सोडले नाही .म्हणूनच भगवंताला म्हणावे लागले की दैत्यांमध्ये मी आहे .म्हणूनच खांबामध्ये भगवंतांना प्रगट व्हावे लागले
प्रश्न असा पडतो की दैत्य कुळात प्रल्हादा सारखा भक्तशिरोमणी कसा जन्माला आला ? त्याची एक गोष्ट आहे .जेव्हा हिरण्यकश्यपू तपश्चर्या करत होता तेव्हा प्रल्हादाची माता कयाधू हिला नारदांनी आपल्या आश्रमात ठेवून घेतले .तिची उचित वेळी प्रसूती होउन गर्भसंरक्षण झाले .कायाधूने नारदांची उत्तम सेवा केली नारदांनी धर्माचे भक्तीस्वरूप आणि आत्मानात्मविवेक रूप ज्ञान यांचा उपदेश केला त्या उपदेशांचे संस्कार प्रल्हादावर झाले .त्यामुळे नारायणाशिवाय त्याला कांहीच दिसत नव्हते .