Friday, October 21, 2011

श्लोक ९५

II श्रीराम समर्थ II 

अजामेळ पापी वदे पुत्रकामे।
तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥
शुकाकारणे कुंटणी राम वाणी।
मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥
 



जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

lochan kate said...

श्लोक ९५...
अजामेळ पापी वदे पुत्रकामे |
तया मुक्ति नारायणाचेनि नामें ||
शुका कारणे कुंट्णी राम वाणी |
मुखे बोलता ख्याति जाली पुराणी ||९५||
हिन्दी में...
अजामेल पापी वदे पुत्र काम से |
उसे मुक्ति नारायण के नाम से ||
शुक कारण कुंटीण वदती राम वाणी |
मुख से बोलता जो होती ख्याती पुराणी ||९५||
अर्थ... श्रीराम दास जी कहते है कि.... अजामेल नामक राक्षस नें पुत्र प्राप्ति के अहंकार में रामनाम लेने से मुख फ़ेर लिया था |अत: जो अहंकार के कारण रामनाम लेने से मना करते है उनका जीवन सार्थक कैसे हो ? अत: उसको मुक्ति नारायण का नाम लेने से ही प्राप्त हो सकती है | तोते के साथ रहकर कुलटा भी राम नाम वाणी से बोलने लगी थी और राम बोलने से ही पुराणों में उसकी ख्याति हुई थी | अत: जब राम नाम बोलने से एक कुलटा का उध्दार हुआ था तो साधारण मानव का उध्दार क्यों नही हो सकता ? अत: हे मानव ! राम नाम लेकर अपने जीवन को सार्थक करने का प्रयास कर |

Dr.Madhavi Mahajan said...

अजामेळ नावाचा एक विव्दान व तपश्चर्यावान ब्राह्मण होता. तो नारायणाची भक्ति करी. म्हणून त्याने आपल्या मुलाचे नाव "नारायण" ठेविले होते. हेतु हा की नेहमी नारायणाचेच नाव मुखाने यावे. त्या ब्राह्मणाचा प्रारब्धयोग असा की दॆवयोगाने तो एका स्त्रीच्या नादी लागला. तिच्यासाठी त्याने आपल्या बायकामुलांचा त्याग केला. कुसंगतीचा परिणाम होऊन त्याची सर्व तपश्चर्या व नारायणाच्या भक्तीचा लोप झाला. त्या स्त्रीने त्याला लुबाडले व ती त्याला सोडून गेली. वृध्दापकाळी त्याचे डोळे उघडले. त्याचे सर्व वॆभव नष्ट झाले. त्याला पश्चाताप झाला व त्याला नारायणाची आठवण झाली. पश्चातापाच्या आगीत होरपळणा-या अजामेळाने नारायणाच्या नावाचा टाहो फ़ोडला. त्यामुळे नारायण त्याच्यावर प्रसन्न झाला व त्याला सद्गती मिळाली.

Dr.Madhavi Mahajan said...

तसेच पिंगला नावाची एक वेश्या होती. तिने एक पोपट पाळला होता. त्याचे नाव तिने राघव असे ठेवले होते. सौंदर्य नष्ट झाल्य़ावर तिला कोण विचारणार? पूर्वकर्माबद्द्ल तिला पश्चाताप वाटू लागला व अंतिम समयी राघवाचा घोष चालू केला. या राघवनामामुळे तिचे नाव पुराणात गायिले गेले. समर्थ म्हणतात याच देही गति पावली कुंटणी । रामनाम वाणी उच्चारित ॥

या दोन कथा वाचल्या वर हा प्रश्न पडतो केवळ अंतिम समयी निराळ्या मिषाने घेतलेल्या नामाने दोघांना उत्तम गती कशी प्राप्त झाली ? मुलाला हाक मारणारा अजामेळ अन आपल्या पाळलेल्या राघूस राघोबा म्हणून हाक मारणारी पिंगला या दोघांना भगवंतानी वैकुंठात स्थान दिले. "ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी या संदर्भात अजुन काही दाखले देऊन म्हटले आहे की तुझावर उपकार करणा-या लोकांवर तु उपकार केले आहेत. वास्तविक योग्यता नसलेल्याच्या ठिकाणी आपले औदार्य दाखवले आहेस." म्हणजे अन्य मिषाने घडलेल्या नामाने जर अशी सद्गती प्राप्त होते तर श्रध्दापूर्वक नामाने उत्तम गती निश्चितच मिळेल .

या दोन्ही कथांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या कथांमधील अनाचारी व्यक्तिंना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. केलेल्या चुकांची जाणिव, मनापासून झालेला पश्चाताप अन नकळत घडलेले भगवत स्मरण...केवळ दुर्वर्तन केले आणि नकळत नाम घडले असे झालेले नाही ..केलेल्या कृत्याचा अत्यंतिक पश्चाताप आणि शरणागती ही यामधील महत्वाची आहे .
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

suvarna lele said...

अजामेळ हा कान्यकुब्ज देशाचा सदाचारी ब्राम्हण होता .पण मनावर तो नियंत्रण ठेऊ शकला नाही एकां दासी पासून त्याला दहा पुत्र झाले .सर्वात धाकट्या मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले .नारायण त्यांचा आवडता मुलगा होता .तो मृत्युशय्येवर असताना सतत नारायणाला हाका मारत होता .त्यामुळे विष्णुदूत यमदूतांना त्याच्यावर पाश टाकू देत नव्हते .विष्णुदूत व यमदूतांमध्ये चाललेला संवाद अजामेलाने ऐकला .त्याला नामाचे महत्व कळले .तो विरक्त ,भगवद भक्त झाला .त्याला उत्तम गती मिळाली .केवळ मुलाचे नाम घेतल्याने तो विष्णू पदाला पोहोचला
पिंगला वेश्येने एक पोपट पाळला होता .त्या पोपटाचे नाव राघव असे तिने ठेवले होते .तिचे सौंदर्य ओसरल्यावर तिला कोणी विचारेनासे झाले .मरण समयी तिला तिच्या पोपटाची काळजी वाटू लागली की आपल्या मागे पोपटाचे कसे होणार ?म्हणून ती सारखी राघवा राघवा असे नाम घेऊ लागली . या राघवाच्या नामामुळे तिचे नाम पुराणात गायले गेले .
म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे हेतू पुरस्सर नाम न घेता ते केवळ परमेश्वराचे नाम होते म्हणून पिंगला आणि अजामेळ उद्धरून गेले ,असा परमेश्वर दयाळू आहे ,प्रेमळ आहे .म्हणून हे मना ,सतत नाम घे .आपोआप उद्धरून जाशील .