Friday, August 17, 2012

श्लोक १३५

II श्रीराम समर्थ II

धरीं रे मना संगती सज्जनाची।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।
महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !
 

2 comments:

lochan kate said...

श्लोक १३५.....

धरी रे मना संगती सज्जनाची |
जेणे व्रुत्ति हे पालटे दुर्जनांची ||
बळे भाव हे सद्बुध्दि सन्मार्ग लागे |
महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे ||१३५....
हिन्दी में .....
हे मन ! धरो संगति सज्जनों की |
जिससे प्रव्रुत्ति पलटे दुर्जनों की ||
मन से सद् बुध्दि सन्मार्ग लगता |
महाक्रुर वो काल विक्राल भंगता ||१३५....
अर्थ....
श्री समर्थ राम दास जी कहते है कि हे मानव मन ! सदैव सज्जन लोगों की संगति में रहना चाहिये , जिसके कारण दुष्ट प्रव्रुत्ति रखने वाले लोगों का नाश हो जाता है |जब भी मानव की बुध्दि सन्मार्ग की ओर जाती है तब महा क्रुर [यम] [ काल ] भी भंग हो जाता है अर्थात् उसका भी अंत हो जाता है |

suvarna lele said...

या श्लोकात समर्थ सज्जनाची संगती धरायला सांगतात .येथे सज्जन म्हणजे सर्व सामान्य सभ्य गृहस्थ नाही .तो सत्पुरुष आहे . सत्पुरुषाच्या संगतीत दुर्जनाची सुध्दा बुद्धी बदलता येते .दुर्मती सुमती होते . सन्मार्गाने जाण्याची सदाचरणाची प्रेरणा सज्जन संगतीने मिळते . सज्जन सत्य धर्माने चालतात ,वागतात ,त्यामुळे त्यांना कशाचेही भयं नसते .अत्यंत क्रूर असणारा काळ ही त्यांना घाबरवू शकत नाही .