Friday, July 13, 2012

श्लोक १३०

II श्रीराम समर्थ II

 
मना अल्प संकल्प तोही नसावा।
सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा।
रमाकांत एकान्तकाळी भजावा॥१३०॥



डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण




जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १३०...
मना अल्प संकल्प तोही नसावा |
सदा सत्य संकल्प चित्ती असावा ||
जनी जल्प वीकल्प तोही त्यजावा |
रमाकांत एकांत काळी भजावा ||१३०||
हिन्दी में....
मन अल्प संकल्प वो भी ना रखो |
सदा सत्य संकल्प चित्त में रखो ||
जनों का विकल्प वो भी त्यजो तुम |
रमाकांत एकांत में यूं भजो तुम ||१३०||
अर्थ.......
श्री रामदास जी कहते है कि हे मानव मन ! व्यक्ति के विचार में थोडा भी लोभ नही होना चाहिये | जीवन के प्रत्यैक कार्य के करनें में सत्यता का संकल्प होना चाहिये | लोगों में बैठकर [ बिनाकारण की ] व्यर्थ की बातों में समय नही गंवाना चाहिये | एकांत में बैठकर श्रीराम का सतत् नाम स्मरण करना चाहिये |

suvarna lele said...

मना अल्प संकल्प नसावा असे समर्थ सांगतात संकल्प म्हणजे विचारांचा तरंग .आपल्या मनात अनेक विचार येत असतात की ज्याचा आपल्याशी काही संबंध नसतो वर्तमान पत्रातील अनेक बातम्या आपल्यावर परिमाण करून जातात आपल्या भोवती वावरणा-या लोकांच्या विचारांचा आपल्यावर परिणाम होत असतो . ते विचारही आपल्या मनात असतात .त्यांच्यावर काय उपाय काय करता येईल असाही विचार आपले मन न कळत करत असते .यालाच समर्थ अल्प संकल्प म्हणतात .असे विचार करण्यापासून अलिप्त रहा असे समर्थ म्हणतात .
त्याऐवजी समर्थ सत्य संकल्प मनात धरा असे समर्थ सांगतात .सत्य संकल्प म्हणजे चांगले विचार करावे ,ईश्वराच्या लीलांचे ,संत चरित्राचे स्मरण करावे ,सदूपदेशाचे चिंतन करावे .नेहमी अनुसंधानात असावे .घोळ घालू नये .
मनात एखादा चांगला विचार येणे हा सत्य संकल्प .त्यानुसार न वागता दुसरेच वागण्या चा विचार करणे यालाच विकल्प म्हणतात .विकाल्पामुळेच एकमेकांमध्ये अपसमज होतात .निंदा करण्याचा मोह होतो यासाठी एकच उपाय आहे ईश्वराचे भजन एकांतात करणे .ईश्वराच्या भजनाने एकाग्रता वाढते .ईंद्रीये शांत राहतात .मन मोकळे राहते .दासबोध सखोल अभ्यास सारखा साधना सप्ताह ही एकांतवासा सारखाच आहे कारण येथे खरोखरच घराची ,घराच्या माणसांची आठवणही होत नाही .म्हणूनच समर्थ एकांतकाळी रमाकांत म्हणजे परमेश्वराला भजण्यास सांगत आहेत .