Friday, August 12, 2011

श्लोक ८५

II श्रीराम समर्थ II



भजा राम विश्राम योगेश्वरांचा।
जपू नेमिला नेम गौरीहराचा॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।
तुम्हां सोडवी राम हाअंतकाळीं॥८५॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

भजा राम विश्राम योगेश्वरांचा |
जपु नेमिला नेम गौरी हरा चा ||
स्वये नीववी तापसी चन्द्र मौळी |
तुम्हा सोडवी राम हा अन्तकाळी ||८५||
हिन्दी में...
भजो राम विश्राम योगेश्वर का |
जपो नेम रखो रे गौरी हर का ||
स्वयं शांत होते है जब चन्द्र मौली |
तुम्हे राम छुडाते है अन्त:काली ||८५||
अर्थ ..... श्रीराम दास जी कहते है कि हे मन ! श्री शंकर जी के गुरु श्री राम जी को भजते रहो | स्वयं क्रोधित होते हुए भी शंकर जी ने राम नाम का जाप का नियम बनाया है | अत: उस नियमानुसार जाप करते रहना चाहिये |राम नाम के जाप से स्वयं शंकरजी भी क्रोध से शांत हुए है | अत: ऐसे श्री राम नाम को इसलिये जपते रहो क्योंकि अंतकाल के समय श्री राम ही मुक्ति प्रदान करते है |

suvarna lele said...

शंकरांसारख्या तपस्व्याचा दाह ,श्रीरामांच्या नाम स्मरणाने थांबला .तेच श्रीराम सर्व योगी ,मुनींचे विश्रांतीचे स्थान आहे .योग्याचे मुगुटमणी असणारे शंकर ही राम नामात रंगून जातात . श्रीराम मंत्र हा तारक मंत्र आहे या मंत्राने देह्शांतीच नव्हे तर आत्मशांतीही भगवान शंकरांना मिळाली .सर्व यज्ञात श्रेष्ठ असणारा जप यज्ञ भगवान शंकरांनी केल्यामुळे त्यांना आराम मिळाला .त्यामुळे देहात असताना आणि देहात नसताना ही शांती समाधान देणारा हा मंत्र आहे . उलटे नाम घेउन ही वाल्या कोळ्यासारखा पापी मुक्त झाला ,ज्ञानी झाला .अशा तारक मंत्राचा ध्यास जर प्रत्येकाने घेतला तर जन्म मरणाच्या फे-यातून नक्कीच सुटका होते .