Friday, July 22, 2011

श्लोक ८२

II श्रीराम समर्थ II

बहु नाम या रामनामी तुळेना।
अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे।
जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !




2 comments:

suvarna lele said...

३३ कोटी देवाची नामे असताना राम नामच का घ्यायचं ? त्याचे काय वैशिष्ट्य आहे ? असा प्रश्न पडतो . रामनाम श्रेष्ठ आहे .ते का याचा विचार केला तर असे कळते की श्रीराम रावण वधासाठी मनुष्य रूपाने जन्माला आले .रावण वध केला पण रावणाला मुक्ती दिली .रावण वधानंतर ‘मी दशरथ पुत्र राम आहे ‘असे ते म्हणतात .यातून त्यांनी मानवता दाखवली . तसेच अनेक जीवांचा उध्दार करून ईशत्व दाखवलं .एकबाणी ,एकवचनी ,एकपत्नी व्रती श्रीराम मानवापुढे नराचा नारायण बनण्याचा आदर्श ठेवतात .
भगवान श्रीकृष्ण बालपणापासून अघटीत घटना घडवून आणत होते .देव व मानव या दोन्ही रूपात ते वावरले .त्यांनी दाखविलेल्या लीला मानव आचरणात आणू शकत नाही .त्यांना पूर्ण अवतार मानतात .म्हणूनच श्रीरामाचे चरित्र मानवांनी आचरणात आणावे ,असे आहे आणि त्यांचे देव स्वरूप आपल्यात आहे ,सर्व चराचरात व्यापून आहे ,सुदैवाची गोष्ट ही आहे की त्या व्यापक रूपाशी आपण त्यांच्या नामाने जोडू शकतो म्हणून रामनाम घ्यायचे .
पण अभागी ,दुर्दैवी माणसाला त्याचे महत्व कळत नाही .
पार्वतीश ,म्हणजे शंकरांनी समुद्र मंथनातून निघालेले विष प्यायल्यावर त्यांच्या कंठाचा दाह झाला .तो कोणत्याही उपायांनी थांबला नाही .शेवटी रामनाम घेतल्यावर थांबला .आपल्या सारखे क्षुद्र मानव विषय वासनेत बुडून जातात ,संसारात सागरात डुबक्या घेत राहतात .त्यांनी या रामनामाची उपेक्षा केली तर त्यांची अवस्था काय होईल ? सर्व शक्तीमान ,देवांचा देव महादेव ही राम नाम घेतात ,तर आपण घ्यायाला काय हरकत आहे ? असा प्रश्न येथे समर्थ विचारतात .

lochan kate said...

श्लोक ८२ ....श्लोक ८२ ....
बहु नाम या राम नामी तुळेना |
अभाग्या नरा पामरा हे कळेना ||
विषी औष्ध घेतले पावतीशे |
जीवा मानवा किंकरा कोण पुसे ||८२||
हिन्दी में....
बहु नामों में राम की तुलना नही है |
अभागी पामर नर को समझे नही है ||
विष औषधि लेने से नही जीते है
जीव मानव किंकर को कौन पुछे ||८२||
अर्थ....
श्रीरामदासजी कहते है कि हे मन ! अन्य काई देवताओं के नामों की बराबरी इस राम नाम से नही की जा सकती | परन्तु अभागे मानव को जीवन में यह बात समझ में नही आ सकती है | यह मानव जीवन एक छोटे से कंकड के समान है | इसे कौन पूछेगा ? जैसे विषपान के बाद अगर औषधि ली तो किस काम की ? उसी प्रकार समय निकल जाने के बाद में कोई कार्य किया तो क्या फ़ायदा ? इसलिये जीवन में समय रहते रामनाम करके जीवन को सार्थक करने का प्रयास करना चाहिये |