Friday, August 20, 2010

श्लोक ३४

II श्रीराम समर्थ II

उपेक्षा कदा रामरुपी असेना |
जिवा मानव निश्चयो ते वसेना ||
शिरी भार वाहें बोले पुराणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|| ३४||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण !

जय जय रघुवीर समर्थ !

5 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar)....श्लोक ३४..
उपेक्षा न होती कभी राम रुप में जो|
मानव के मन में वसते
है वो जो||
सहना है भक्तों के भार को वचन हो|
उपेक्षा ना करते प्रण
रामजी जो||

अर्थ... श्रीराम दासजी कहते है कि हे मनुष्य मन ! जो
व्यक्ति श्रीराम का सच्चा भक्त है,उसके मन में श्रीराम के प्रति उपेक्षा
कदापि नही आ सकती |प्रत्यैक मानव जीव में श्रीराम निश्चित रुप से वास करते
है| पुराणों के अनुसार श्रीरामचन्द्रजी कहते है कि मैं सम्पूर्ण भार वहन
करने के लिये तैयार हू| फ़िर भी मनुष्य को चिंता करने की क्या आवश्यकता है?
ऐसे श्रीरामचन्द्रजी अपने भक्तों का सदैव अभिमान ही करते है उनकी उपेक्षा
कभी भी नही करते| हे मानव इसलिये तु ऐसे श्रीराम की शरण मे जाकर अपने जीवन
को सार्थक कर|............

suvarna lele said...

श्रीरामाच्या ठिकाणी उपेक्षा नाही ।जशी आई आपल्या मुलाची उपेक्षा करत नाही त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते कारण लहान मुलाची आपल्या आईवर संशयरहित भक्ती असते ,काही झाल तरी आई आपल्या मागे आहे असा विश्वास् बाळाचा आईवर असतो ,तसा भाव ज्या भक्ताचा रामरायांवर असतो त्याची उपेक्षा रामराय करत नाहीत ।पण माणसामध्ये तीन प्रकाराच्या श्रध्दा असतात ।सात्विक ,राजस ,आणि तामस ! या श्रध्दा व्यक्तीनुरुप बदलतात ।सात्विक श्रध्दा असणारे देवाची पूजा करतात ,राजस श्रध्दा असणारे यक्षांची पूजा करतात ।तर तामस श्रध्दा असणारे लोक भूतगणाची पूजा करतात ,सात्विक श्रध्दा देवाकडे नेते ,परमार्था कडे नेते ।सत्य पदार्थावर नितान्त प्रेम किंवा निष्ठा हे पारमार्थिक श्रध्देचे कारण असते ।अशी श्रध्दा असली तरच ज्ञान व शान्ती मिळते ,नाहीतर अध :पतन होते ।जर माणसांचा सद्गुरु किंवा आराध्य देवतेवर नि:संशय विश्वास असेल तर सद्गुरु ,आराध्यदैवत त्याच्या संकट काळी तारतात ।
श्रीरामांवर विश्वास असला ,श्रध्दा असेल ,अनन्यता असेल तर श्रीरामही भक्तांची उपेक्षा करत नाहीत ,परन्तु लोकांचा विश्वास स्वत:वर जास्त विश्वास असतो ।मी केलं म्हणून एखादी गोष्ट झाली अशी त्यांची भावना असते ।पण त्यांच्या लक्षात येत नाही की कर्ता करविता तो श्रीराम आहे ।भगवंत आपल्या भक्तांचा भार वहात असतात ।असे दाखले आपल्याला पुराणात मीळतात ।आताच्या संत चरित्रात सुध्दा आपल्याला मीळतात असा भक्ताचा सर्व भार शिरावर घेणारे श्रीराम असताना माणसाने संशय का ठेवावा ?

Gandhali said...

श्लोक ३४

या श्लोका आधीच्या ७ श्लोकात समर्थांनी श्रीरामाचे सामर्थ्य व आपल्या दासांची उपेक्षा ते कधीच करणार नाहीत हे वारंवार सांगितलेले आहे.पण उपेक्षा श्रीरामाकडून नाही तर उणीव आपल्या श्रद्धेत असते हे मर्म समर्थ या श्लोकात उलगडून सांगतात.
आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टीत आपण इतरांवर विश्वास ठेवतो त्यामुळेच तर सगळे व्यवहार करू शकतो.डॉक्टर ,ड्रायव्हर,मालक,नोकर,शिक्षक, कर्मचारी, कामवाली खूप मोठी यादी आहे या सर्वांचा एकमेकांवर विश्वास आहे म्हणूनच सर्व कामे सुरू आहेत .तसाच निदान तेवढा तरी विश्वास तुम्ही देवावर ठेवावा . अज्ञानामुळे भरवसा येत नाही ,निष्ठा चंचल होते. रोजच्या व्यवहारातले उदाहरण पाहिले तर १० डॉक्टर फिरणारे रोगी आपण पाहतो गुण नाही आला की बदल डॉक्टर,असे का होते तर एकाही डॉक्टरवर विश्वास नसतो.तसेच एकदाका एखाद्या डॉक्टर वर विश्वास बसला तर इतर कोणी ही काही उपाय सुचवला तर माझ्या डॉक्टराना विचारतो अन मग करतो असे ही म्हणणारे बरेच भेटतात .हा दृढ विश्वास, असाच भगवंत , सद्गुरू यांचेवर ठेवावा.
" न सांडी रे भावो,टाकी रे संदेहो I रामकृष्णी टाहो नित्य फोडी II "
समर्थ श्रीरामाचा मी भक्त आहे आणि ते माझी कधीच उपेक्षा करणार नाहीत हा निश्चय माणसाने बाळगावा.माणसाचा माणसावर विश्वास नसेल पण शास्त्र पुराणे यावर तरी विश्वास ठेवावा.भक्त अनन्य होऊन माझ्याकडे आला तर त्याचा सर्व भार मी शिरावर घेइन असे भगवंत म्हणतात. पुराणातील कथांमध्ये याची खुप उदाहरणे आहेत. "योगक्षेमं वहाम्यहम "हे वचन तर प्रसिद्ध आहे.गीतेत ,रामायणात भगवंताने हेच वचन दिले आहे.
म्हणूनच हे मना ! कोणताही संदेह न बाळगता श्रद्धा दृढ करून भगवंताला या श्रीरामाला शरण जा तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही.

Prof. Limaye said...

श्लोक ३४
राम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही.फक्त आपण त्याचे भक्त व्हायला हवे.भक्त म्हणजे जो आपल्या आराध्य देवतेपासून विभक्त नाही.रामदासांचे आराध्यदैवत प्रभूश्रीराम ,संत तुकारामांचे पांडुरंग ,विवेकानंदांचे प्रभु रामकृष्ण,गोंदवलेकरांचे तुकाई तर ज्ञानेश्वरांचे आराध्य दैवत श्रीकृष्ण .
राम आपली उपेक्षा करणार नाही हा दृढ निश्चय मात्र हवा. माणसाजवळ नसतो तो दृढ निश्चय .शेंडी तुटो वा पारंबी पण मी आता माझ्या आराध्यदेवतेला सोडणारा नाही हा तो दृढ निश्चय.खरा विचार करायला गेलो तर रामाला,मारुतीला,शनीला थोडे पेढे,खडीसाखर,तेल,नारळ दिला की आपले देवाबद्दलचे कार्य झाले असे आपण म्हणतो.एवढेच नाही तर काही बिझी महाभाग फोनवरून भटजींना एकादष्ण करायला सांगतात व माझा घरगडी प्रसाद घेउन जायला येईल असेही सांगतात. भटजीसुद्धा एक केळे आणि नारळ याची किंमत २१ रु मिळाली असे समजून खुश. ऑफिसला जाताना ,येताना देऊळ दिसले की चपला बूट काढले न काढले अशा अवस्थेत देवाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे जाणारे आपण खुपजण पाहतो. पूर्वी आम्हा चतुश्रुंगी देवळाजवळ राहत असू तेथे रोज सकाळी व संध्याकाळी एक मजेशीर दृश्य दिसायचे, कंपन्यांच्या बसेस देवळासमोरून जाऊ लागल्या की अगदी बस चालकासकट सगळ्यांच्या माना देवळाकडे वळायच्या व हात ही जोडले जायचे . देवीला गार्ड ऑफ ऑनर मिळायचा पण एक ही महाभाग बसमधून उतरून देवीच्या देवळात कधी गेलेला पहिला नाही अगदी दुसरे दिवशी सुट्टी असली तरीही . मग ही देव-देवतांची उपेक्षाच नाही का ? आपण देवाची अशी उपेक्षा करतो पण देव (राम) आपली उपेक्षा करणार नाही त्याचे सदैव आपल्याकडे लक्ष असते.हे अगदी पुराणकाळापासून सिद्ध आहे.तो ग्वाही देतो की माझ्या भक्ताचा भार डोक्यावर घेईन कारण राम हा भक्ताचा अभिमानी आहे.

Prof. Limaye said...
This comment has been removed by the author.