Friday, April 2, 2010

श्लोक १४

 श्रीराम समर्थ
जीवा कर्मयोगे जनी  जन्म जाला |
 परी शेवटी काळमुखी निघाला ||
महाथोर ते मृत्युपंथेची गेले |
कितीएक ते जन्मले आणि मेले || १४||


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे " मनाचे श्लोक " यावरील श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !

6 comments:

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥
जीवाला जन्म मिळाल्यापासून त्याच्या जीवनाचा प्रारंभ होतो आणि त्याच्या मृत्त्यूमध्ये त्याचा अंत होतो....या काळामध्ये तो आपले जीवन दु:खामध्ये व्यतित करतो.....माणसाचा जन्म म्हणजे समर्थ म्हणतात जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी । पूर्वजन्मातील वासनेनुसार जीवाला जन्म मिळत असतो....जन्म हे कुविद्येचे फ़ळ आहे....कुविद्या म्हणजे अज्ञान जोपर्यंत अज्ञान आहे तो पर्यंत वासना आहेतच.....आणि वासना या जन्माचे कारण आहेत.....जन्म कुविद्येचे फ़ळ । जन्म लोभाचे कमळ । हा लोभ म्हणजे आसक्ति.....पूर्वसंचितानुसार जन्माला आलेला जीव संपूर्ण जीवन ज्ञानहीन जीवन जगतो... स्वस्वरूपाला तर विसरतोच पण मृत्यूचे देखील त्याल विस्मरण होते....आणि हा मृत्यू असा आहे की साक्षात भगवंताचा अवतार देखील याच्या तडाख्यातून सुटलेला नाही ही जाणिव समर्थ याठिकाणी करून देत आहेत..

जय जय रघुवीर समर्थ॥श्रीराम॥

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥
मृत्त्यूची आठवण करून देऊन समर्थ आपल्या मनात भय निर्माण करत नाहीत तर जीवाला जसे स्वस्वरूपाचे विस्मरण झाले आहे तसेच मृत्त्यूचे देखील विस्मरण झाले आहे म्हणुन त्याची जाणिव समर्थ करून देत आहेत....ही जाणिव करून देउन समर्थ सांगतात रामदास म्हणे स्वहित करणे । निर्धार मरणे मागेपुढे । (स्फ़ु.प्र) नरदेह प्राप्त झाला आहे तर आत्महित साधुन घेण्याविषयी मार्गदर्शन करतात...सर्व संतांनी देह्बुद्धि सोडण्याची धडपड करण्याविषयी सांगितले आहे तसेच काळा विषयी सावध केले आहे.. तुकाराम महाराज म्हणतात नाशवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान । .... दासबोधतील मृत्त्यूनिरुपण या समासामध्ये समर्थांनी याविषयी विस्ताराने स्पष्ट केला आहे.....काळ हा असा आहे की त्याचा समोर कोणीही असला तरी तो कोणावरही दयामाया दाखवत नाही...कितीही उच्च कुळातला असला तरीही मृत्त्यू समोर सर्व सारखेच....लहान थोर हा भेद मृत्त्य़ू मानत नाही...
मृत्त्य़ू न म्हणे हयपती । मृत्त्य़ू न म्हणे गजपती । मृत्त्य़ू न म्हणे नरपती । विख्यात राजा ।। दास.३.९.१४॥
मृत्त्य़ू न म्हणे वरिष्ट जनी । मृत्त्य़ू न म्हणे राजकारणी । मृत्त्य़ू न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥ दास.३.९.१३॥

जय जय रघुवीर समर्थ॥

Dr.Madhavi Mahajan said...

॥श्रीराम॥

मृत्त्य़ू हा अटळ आहे त्याच्या पासून कोसो दूर पळण्याचा प्रयास केला तरीही योग्य वेळ आली की तो आपल्याला गाठतोच ....
मृत्याभेणें पळों जातां| तरी मृत्य सोडिना सर्वथा |
मृत्यास न ये चुकवितां| कांहीं केल्या ||दास.३.९.३८|| जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्त्य़ू हा आहेच....
अमृतप्राशन करुन अमर झालेल्या देवांना देखील मृत्त्य़ू चुकला नाही...अमर अमृतपान करिती । तेही मरणार्णवीं बुडती ॥ (ना.भा.२७.७०३) राजा असो रंक असो, आस्तिक असो नास्तिक असो , सिद्ध असो साधक असो मृत्त्य़ू सर्वांना गाठणारच..... प्रत्येक जीवाने मरणाचे स्मरण ठेवावे समर्थ म्हणतात
मरणाचें स्मरण असावें| हरिभक्तीस सादर व्हावें |
मरोन कीर्तीस उरवावें| येणें प्रकारें ||दास.१२.१०.१३|| मरणाचे स्मरण ठेऊन हरिभक्तीत मन रमवावे आणि जीवन असे जगावे की आपल्या मृत्यू नंतर देखील आपण कीर्ति रुपाने उरावे असे समर्थांचे सांगणे आहे .....आयुष्य कधी संपेल याचा भरवसा नाही, कधी काय घडेल सांगता येत नाही म्हणून सावधपणे वागून लोकांसाठी जेवढे करता येईल तेवढे करावे....यापूर्वीच्या श्लोकांमध्ये समर्थ हेच सांगत आहेत.....

जय जय रघुवीर समर्थ

Kalyan Swami said...

As stated by Lochan kate ( Gwaliar ) ..
श्रीसमर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! यह जीवन हमे अच्छा कर्म करने के लिए ही प्राप्त हुआ है| कोई भी अमर नही है| इस जीवन के अनंत काल के पथ पर कितने ही लोग आये और चले गये| समयानुसार अंत मे प्रत्येक को मरणावस्था को प्राप्त करना ही है | काल ने किसी को भी नही छोडा है| इसलिये इस अनमोल जीवन मे सद्कर्म करके ही जीवन जीना चाहिए|

lochan kate said...

[हिन्दी मे]
कर्म योग से रे जीव जन्म आया|
पर अंत मे काल ले के है जाया||
महान है जो म्रुत्यु पंथ पर गये रे|
न जाने कितने ज्न्मे और मर गये रे||१४||श्रीराम||

Anonymous said...

Ok