Friday, March 19, 2010

श्लोक १२

II श्रीराम समर्थ II

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे||
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥१२॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल  श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

6 comments:

Kalyan Swami said...

Now you can listen the Nirupan by Shraddhey Dr. Sushamatai Watave on This Shlok directly by cliking the link !
We shall continue the practice for upcoming Shloks also.

Jay Jay Raghuveer Samarth !

Kalyan Swami said...

As stated by Dr. Madhavi Mahajan...

||श्रीराम||

सर्व सामान्य माणसाची वृत्ती अशी असते की त्याला आयुष्यात मिळालेल्या सुखापेक्षा दु:खाचेच तो अधिक चिंतन करत असतो.
सुखाचे प्रसंग येतात आणि तेव्हा स्व:तच्या कर्तृत्वाने हे सुख प्राप्त झाले हा व्यर्थ अभिमान बाळगतो ..
पण दु:ख आल्यावर मात्र इतर कोणी याला कारणीभूत आहेत असे समजतो!
"सतत या दु:खाचे चिंतन करू नकोस".असे समर्थ सांगतात कारण उत्तम कर्म केले त्याचे फळ भोगावे लागणारच आहे
मग त्या दु:खाचे चिंतन करण्यापेक्षा भगवंताचे चिंतन कर ज्यामुळे तुझी वृत्ती शांत होऊन तुला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो .......
शोक आणि चिंता यापासून सर्वथा दूर रहा.. जर भगवंतावर विश्वास असेल तर मनुष्याला या चिंता सतावत नाहीत ....
"सर्व परिस्थितीतून तो मला तारून नेईल" हा विश्वास- पक्की निष्ठा, असेल तर चिंता मनुष्याच्या मागे लागत नाहीत.
पण सर्व साधारणपणे, यांत्रिकपणे देवपूजा करून व्यवहार करणाऱ्या जीवाच्या मागे चिंताच लागतात हे आपण पाहतो.
पूजेच्या माध्यमातून आपल्या अंत: करणातील अंतरात्मा जागा करणे हेच देवपूजेचे वर्म असते.सामान्य माणूस ज्या देहाच्या सुखाकरिता धडपडत असतो, तो देह जो चालवतो त्याचेच विस्मरण त्याला होते त्यामुळे तो सतत चिंता आणि दु:खाच्या भोवर्यात सापडतो .....


जय जय रघुवीर समर्थ !

Shripad Kulkarni said...

Changla upakram aahe
Asa Prayatna sarva sant sahitya baddal zala pahije
Mee sudhdha madat karayala tayar ahe.
Sunil Chincholkar sarana, Chaitanya Maharaj Deglurkarana Acharya Govind dev girijina, ani asha sarva aaj sant sahityavar shraddhene vivechan karnarana ya karya kade krupadrusti karita aamantrit karave. Apla karyala hardik shubhechcha!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Shripad Kulkarni Nashik

Kalyan Swami said...

As stated by Dr. Madhavi Mahajan .....

||श्रीराम ||
मानवी जीवनातील हे दु: ख निर्माण होण्याची मूळ कारण म्हणजे देहासक्ती !
मुळातच आसक्ती ही सर्व विकारांची आई आहे .असे समर्थ सांगतात ...आसक्तीतूनच काम , क्रोध, लोभ, हे विकार प्रवेश करतात.....या विकारांची आपल्या मनावर इतकी सत्ता स्थापित होते की देहाची आसक्ती सुटता सुटत नाही मी कर्ता हाच भाव वाढीस लागतो ....म्हणून समर्थ म्हणतात विवेकाच्या आधाराने ही देहबुद्धि सोडून दे, देहाविषयीचा अहंकार , आसक्ती या दोन्ही गोष्टी मनुष्याला घातक आहेत देहाला मिळणाऱ्या सुखाला महत्व दिल्याने विषय सुखाच्या मागे धावायची मानवी वृत्ती वाढते, म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी... आणि स्वस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घे !
ऐक ज्ञानाचे लक्षणं| ज्ञान म्हणजे आत्मज्ञान |
पाहावे आपणासी आपण | या नाव ज्ञान ||दास.५.६.१||
स्वरुपाची जाणीव करून घेऊन 'राम कर्ता' हा भाव वाढीस लावण्यासा समर्थ सांगत आहेत
कारण मी-कर्ता या भावनेतूनच चिंता-शोक मागे लागतात पण राम-कर्ता या भावाने मात्र यश -कीर्ती-प्रताप प्राप्त होते असे समर्थांचे सांगणे आहे ....


जय जय रघुवीर समर्थ |

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar).. श्लोक १२....
श्री समर्थ रामदासजी कहते है कि-- हे मानव ! अपने मन को किसी भी प्रकार के कार्य से दु:खी नही करना चाहिए |मन को कभी-भी शोक या चिंता का लेशमात्र भी नही छुना चाहिए|सदैव अपने स्वविवेक से कार्य करते रहना चाहिए एवं अपने शरीर के माया रुपी मोह से मुक्त रहकर जीवन व्यतीत करना चाहिए|जिससे जीवन के भोग-विलास के मोह का कष्ट नही होता |.

lochan kate said...

[हिन्दी मे--]
मन में कभी दु:ख लाया न कर रे|
सदा सर्वथा शोक चिंता न कर रे||
देहे बुध्दि का भार छोड तु दे रे|
विदेही बन कर तु मुक्त तो हो रे||श्रीराम||१२||