Friday, April 26, 2013

श्लोक १७१

II श्रीराम समर्थ II 

 
असे सार साचार ते चोरलेसे।
इही लोचनी पाहता दृश्य भासे ॥
निराभास निर्गुण ते आकळेना ।
अहंतागुणे कल्पिताही कळेना ॥१७१॥



जय जय रघुवीर समर्थ !

Friday, April 19, 2013

श्लोक १७०

II श्रीराम समर्थ II

 
देहेबुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी ।
विवेके तये वस्तुची भेट घ्यावी ॥
तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे ।
म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ॥१७०॥


डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


 जय जय रघुवीर समर्थ !

Friday, April 12, 2013

श्लोक १६९

II श्रीराम समर्थ II 


 नसे संत आनंत संता पुसावा।
अहंकार विस्तार हा नीरसावा ॥
गुणेवीण निर्गुण तो आठवावा।
देहेबुद्धिचा आठवो नाठवावा ॥१६९॥



जय जय रघुवीर समर्थ !

Friday, April 5, 2013

श्लोक १६८

II श्रीराम समर्थ II 
 
करी वृत्ती जो संत तो संत जाणा।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥
उपाधी देहेबुद्धीते वाढवीते।
परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥
 


जय जय रघुवीर समर्थ !