Friday, May 24, 2013

श्लोक १७५

II श्रीराम समर्थ II 



विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥
हरू जाळितो लोक संहारकाळी।
परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥



जय जय रघुवीर समर्थ !

3 comments:

suvarna lele said...

ह्या श्लोकापासून खरा देव कोणता ,त्याचे स्वरूप काय ,लोक कोणाला देव म्हणतात ह्या विषयांचा विचार केला आहे .ह्या श्लोकात प्रश्न निर्माण केले आहेत ते असे – ब्रह्मदेव सर्वांना निर्माण करतो ,सर्वांच्या कपाळावर त्यांचे भविष्य लिहितो मग त्या ब्रह्मदेवाच्या कपाळावर कोण लिहितो ? शंकर सर्व सृष्टीला संहारकाळी सर्व लोक जाळतो मग त्या शंकराला कोण जाळतो ?
कपोळ म्हणजे कपाळ .त्रिगुणात्मक माया उत्पन्न होते तेव्हा त्या त्रिगुणांचे स्वामी निर्माण झाले सत्व ,रज आणि तम हे त्रिगुण . ह्या त्रिगुणांचे स्वामी ,म्हणजे सत्वाचे स्वामी विष्णू ,रजोगुणाचे ब्रह्मदेव आणि तमोगुणाचे शंकर निर्माण झाले .सृष्टीकर्ता ब्रह्मा आणि सृष्टी संहारकर्ता शंकर निर्माण झाले त्यांनी अनुक्रमे सृष्टी निर्माण केली .आणि सृष्टीच्या संहाराचे काम केले .हे काम अखंड चालू आहे .ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायची आणि सृष्टी संहाराच्या वेळी शंकराने तिचा संहार करून आपणही लय पावायचे हा क्रम चालू आहे
या श्लोकातून समर्थ असे सुचवतात की ,सृषटीकार्य करणारा देव कल्पांन्ती नाहीसा होतो याचा अर्थ या देवांना नियंत्रित करणारा ,कोणीतरी नक्कीच आहे .तो सर्व निर्माण करतो पण त्याला निर्माण करणारा कोणीच नाही तो स्वयंभू आहे ,शाश्वत आहे तोच सर्वांचा आद्य आहे .

lochan kate said...

श्लोक १७५...
विधीनिर्मिता लिहीतो सर्व भाळी |
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ||
हरु जळितो लोक संहारकाळी |
परी शेवटी शंकरा कोण जाळी||१७५||
हिन्दी में.............
विशी ने लिखी निर्मीती सबके भाल |
पर लिखता है कौन उसके रे भाल ||
संहार ते शिव्जब सारे जगत् को |
पर कौन कर सकता है अंत उनको ||१७५||
अर्थ......
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! ब्रह्मा निर्माता है और वही हमारे माथे की भग्य रेखा लिखते है पर्न्तु उन्के माथे पर कौन लिख सकता है ? संहार के समय श्री शंकर जी सारे जगत् को जला देते है परन्तु आखिर में उन शंकर जी को कौन जला सकता है ? अर्थात् उस शिव को जो स्वयं संहारक है उसका अंत कौन कर सकता है |

समर्थदास said...

भगवंत एकच असून त्याने एकातून अनेकत्वाचा पसारा स्वत:च, स्वत:च्याच ठिकाणी आणि स्वत:पासूनच निर्माण केला, तरी जे निर्माण झाले त्याहून तो वेगळा राहिला. जे काही निर्माण झाले त्याच्या नियंत्रणार्थ तो त्यात व्यापून राहिला. तसेच योग्य समयी तोच निर्माता सर्व प्रकृतीला पुन: स्वत:त सामावून घेतो. जेव्हा तो सृष्टी निर्माण करण्याच्या भूमिकेत असतो, तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतो, जेव्हा तो सर्वान्तरात्मा होऊन या सृष्टीचे पालन करतो तेव्हा त्याला श्रीविष्णू म्हणून पूजतो, जेव्हा तोच एक देव संहारकाच्या भूमिकेत असतो, तेव्हा त्याला आपण शंकर, म्हणजे कल्याण करणारा म्हणून पूजतो. या सर्व भूमिकांना काळाची मर्यादा आहे, जशा विद्यार्थीदशेला, गृहस्थदशेला, जीवदशेला आपापल्या मर्यादा आहेत तशा. पण या सर्व भूमिकांमधून व्यक्त होणारा, सर्व सजीव-निर्जीवांच्या रूपात खेळणारा तो परमात्मा हा अनंत, सनातन आहे. हाच त्या एकमेव भगवंताचा ऐश्वर्ययोग गीतेतील नवव्या अध्यायात मांडला आहे.