Friday, January 29, 2010

श्लोक ५

II श्रीराम समर्थ II
मना पापसंकल्प सोडुनी द्यावा !
मना सत्यसंकल्प जीवी धरावा !!
मना कल्पना ते नको वीषयांची!
वीकारे घड़े हो जनि सर्व ची ची !!५!!
जय जय रघुवीर समर्थ !

Friday, January 22, 2010

श्लोक ४

II श्रीराम समर्थ II
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥
जय जय रघुवीर समर्थ !

Friday, January 15, 2010

श्लोक ३

 II श्रीराम समर्थ II
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
जय जय रघुवीर समर्थ !

Friday, January 8, 2010

श्लोक २

II श्रीराम समर्थ II
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
जय जय रघुवीर समर्थ !

Friday, January 1, 2010

श्लोक १

//श्रीराम समर्थ //

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

जय जय रघुवीर समर्थ !